सांस्कृतीक व मनोरंजनात्मक उत्सव
भंडारा
दरवर्च्ची जुन महिन्यामध्ये गावामध्ये यात्रा भरते. ही यात्रा एक आठवडयासाठी असते. हया यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी गावातील गावकरी पंचक्रोषीतील गावकरी, आणि द्याहरामंध्ये राहणारे गावकरी प्रामुख्याने हजर असतात. विविध प्रकारचे मनोरंजन कार्यक्रम नाटय स्पर्धा यांचे आयोजन केले जाते.
दसरा
माता कमलादेवी मंदिरामध्ये दरवर्च्ची विजयादषमी (दसरा) हा उत्सव मोठया उत्सहाने साजरा केला जातो. गावातील प्रत्येकजण हया उत्सवाला हजर असतो. सकाळपासुन ते संध्याकाळ पर्यंत पुजा अर्चा, भजन किर्तन असे कार्यक्रम चालू असतात. गावकरी मोठया श्रध्देने यात भाग घेतात. देवीचा प्रसाद पूर्ण गावामध्ये वाटला जातो.
श्रावणा पोळा
श्रावणी पोळा हा प्रामुख्याने व मोठया प्रमाणात साजरा होणारा सण आहे. त्या सणात प्रत्येक घरातील बैलाला सजविले जाते. गावातील ग्रामपंचायती समोर किंवा चावडी समोर प्रत्येक बैलाला उभे करुन त्याची प्रेमाने पुजा केली जाते. या उत्सवासाठी सुध्दा गावातील आणि द्याहरामध्ये वास्तव्य करणरी गावातील मंडळी आस्थेने उपस्थित असतात.
इतरही उत्सव मोठया प्रमाणात साजरे केले जातात.
- गणोषोत्सव (सार्वजनिक)
- रंगपंचमी
- लोकनाटय व वगनाटय
- तमाषाच्या कार्यक्रमाचे आयोजन इत्यादी.